Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादगटविकास कार्यालयाकडुन घरकुल लाभार्थांची हेळना,शिवसेना ( उबाठा) गटाचे बोंबाबोंम आंदोलन

गटविकास कार्यालयाकडुन घरकुल लाभार्थांची हेळना,शिवसेना ( उबाठा) गटाचे बोंबाबोंम आंदोलन

गटविकास कार्यालयाकडुन घरकुल लाभार्थांची हेळना,शिवसेना ( उबाठा) गटाचे बोंबाबोंम आंदोलन

कन्नड – तालुकाभरात प्रधानमंत्री आवास योजना,शबरी माता आवाज योजना यासह इतर योजनेखाली घरकुलांना मंजुरी देण्यात आलेल्या आहेत.मंजुरी देण्यात आलेल्या घरकुलांसाठी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार सौ.संजनाताई जाधव यांचे हस्ते  बटण दाबून प्रत्येक मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यात 15000 रुपये वर्गही करण्यात केले होते.त्या आधारे बहुतांशी लाभार्थ्यांनी आनंदाचे भरात उसणवारी व व्याज बाट्याने पैसे गोळा करून घरकुलाचे कामही सुरु  केले.यातील बहुतांशी लाभार्थ्यांनी नियमानुसार झालेल्या कामाचा फ़ोटो काढून पुढील मिळणाऱ्या हप्त्यासाठी गटविकास अधिकारी कार्यालयाकडे संभंदीत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने प्रस्तावही पाठवीले, त्यास ही जवळजवळ दोन ते अडीच महिण्याचा कालावधी लोटला आहे.परंतु त्यांना अद्याप त्यांना हप्ता मिळालेला नाही.त्यामुळे ते लाभार्थी मोठ्या संकटात सापडलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments