गणरायाचे थाटात आगमन
गणेश चतुर्थीच्या मंगलप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील ‘पुण्याई’ निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात झाले.
या प्रसंगी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. कल्याण वैजिनाथराव काळे यांनी गणेश मूर्तीचे स्वागत करून विधीवत पूजन केले. भक्तिभाव, उत्साह आणि आनंदी वातावरणात गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रदेश सचिव श्री रवींद्र काळे जिल्हा काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजी नगर अध्यक्ष श्री किरण पाटील डोणगावकर जगन्नाथराव काळे संदीप बोरसे व परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते
गणेश चतुर्थी निमित्त पारंपरिक उत्साह, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला.
गणरायाच्या कृपेने सर्वांना आरोग्य, सुख-समृद्धी आणि ऐक्य लाभो, अशी मंगलकामना खासदार डॉ. कल्याण काळे यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
