गंगापूर शहरातील नवीन ईदगा येथे रमजान ईद निमित्त नमाज मुस्लिम बांधवांनी केली पठण

0
151
Exif_JPEG_420
गंगापूर शहरातील नवीन ईदगा येथे रमजान ईद निमित्त नमाज मुस्लिम बांधवांनी केली पठण
गंगापूर /प्रतिनिधी/ सुभान शहा/गंगापूर शहरातील मुस्लिम बांधवांनी ईद उत्साहात केली साजरी इस्लाम धर्मात पवित्र समजली जाणारी रमजान ईद शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली. इस्लाम धर्मातील शवाल महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाते. रमजानमध्ये महिनाभर मुस्लिम बांधव व भगिनी उपवास ठेवतात, तर शेवटच्या १० उपवासादरम्यान सर्वत्र इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. या दरम्यान कपडे, सोने, सुका मेवा खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडते. यंदा रमजान महिन्याच्या निमित्ताने बाजारात महिन्याभरात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. ईदच्या अनुषंगाने गंगापूर तालुक्यासहित संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात पहाटे साहा वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत प्रत्येक मशीद व ईदगाहमध्ये सामुदायिक नमाज करण्यात आली. त्यानंतर मशीदच्या इमाम (मौलवी) कडून सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात ईद उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. तसेच यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. पोलिसांनीदेखील मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या