गंगापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा पाणी सोडण्यात यावी या मागणीसाठी उपोषण सुरू.
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ गंगापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा पाणी सोडण्यात यावी या मागणीसाठी उपोषण सुरू. तीन दिवसापासून शेतकऱ्यांचा उपोषण सुरू आहे. काय आहे शेतकऱ्यांच्या मागण्या
आमच्या मागण्या १) कागदोपत्री दाखविलेले ६५ टक्के लॉसेस ही तात्काळ रद्द करण्यात यावे व पाण्याची पुन्हा रिकाउंटीग आम्हा सर्व शेतक-याच्या समक्ष व तिचे चित्रीकरण करण्यात यावे. २) धरणात जर उपयुक्त पाणी साठा कागदोपत्री ०.८० टि.एम.सी शिल्लक आहे. तर उजव्या व कोपरगाव कालव्यासाठी त्याच धरणातून पाणी कसे काय सोडण्यात आले याची चौकशी करण्यात यावी. ३) ज्या ज्या वेळेस धरणातून पाणी सोडण्यात येईल त्या त्या वेळेस शेतकरी कमिटी स्थापन करून त्याचेसमक्ष पाणी सोडण्यात यावे. अन्यथा सोडलेले पाणी ग्राहय धरल्या जाणार नाही. ४) ना.म.का.धरणावरील एक्सप्रेस कालवा गंगापूर वैजापुर यांचे नादुरूस्त २ गेट तात्काळ दुरूस्त करण्यात यावे. ५) ज्यावेळेस उजवा कालवा चालु होईल त्याच वेळेस डावा एक्सप्रेस कालवा चालु झाला पाहिजे. ६) ज्याप्रमाणे आमचे रोटेशन पाणी इतर कालव्यास सोडण्यात आलेले आहे तसेच आम्हाला त्याचे रोटेशन पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. ७) शासकीय नियमाप्रमाणे आमचे हक्काचे ११ टि.एम.सी पाणी आम्हाला कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात यावे त्यात कसुर करण्यात येवू नये. ८) आमच्या वाटणीचे रोटेशनचे पाणी इतर कालव्यास सोडण्यात येवू नये व जर सोडण्यात येत असेल तर त्याबाबत योग्य तो लेखी खुलासा करण्यात यावा. ९) ज्या वेळेस धरणाचे व कालव्याचे गेट ओपन किंवा बंद करणार त्यावेळेस शेतकरी समितीस बोलावून चालु बंद करण्यात यावे व नामका चा मनमानी कारभार सर्रासपणे बंद करण्यात यावा. माझे सोबत येणारे सर्व शेतकरी वर्गाचा सर्व पाटबंधारे विभागाच्या अधिका-यावर रोष तयार आहे व होणा-या प्रत्येक घटनेवर सर्वस्वी जबाबदारी ही गोदावरी पाटबंधारे तसेच ना.म.का. वैजापुर-गंगापुर विभागाची असेल, उपोषण कर्ते संदिप काशीनाथ पवार, यांच्या सोबत काही शेतकरी उपस्थित होते,