गंगापूर शहरात स्वच्छतेचे वाजले तीन तेरा प्रशासन करत आहे डोळे झाक, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ गंगापूर शहरातील गोदावरी कॉलोनी येथे अनेक दिवसांपासून नगर परिषद कडून नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करणरी जलवाहिनी फुटली आहे. तसेच या परिसरातील सांड पाणी रस्त्यावर वाहत आहे. तसेच काही नागरिकांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात फुटलेल्या जलवाहिणीचे व सांड पाण्याचे डबके मोठ्या प्रमाणात साचलेले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या पाऊसाळ्याचे दिवस सुरू आहे या ठिकाणी जलवाहिणी व सांड पाण्याचे डबके सासल्यामुळे मोठ्या प्रमाणात डास मच्छर होऊन नागरिकांना अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व तसेच याठिकाणी सांडपाण्याचे सासलेले डबके मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच या ठिकाणी फुटलेल्या जलवाहिणीचे व सांड पाण्याचे तात्काळ व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच येथील नागरिकांनी सांगितले आहे की नगर परिषद प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रार केली आहे. परंतु प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही प्रशासन या प्रकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच गोदावरी कॉलोनी येथे स्वच्छतेचे वाजले तिन तेरा. नगरपालिका प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात येईल याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.