गंगापूर प्रभाग क्रमांक ५ मध्ये फुटलेल्या जलवाहिणीचे कामाला वेग – नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर शहरातील नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ५, जुना मांजरी रोड परिसरातील सिमेंट रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु या परिसरात फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती होत नसल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. दैनिक आत्ताच एक्सप्रेसचे प्रतिनिधी सुभान शहा, यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, यांना भेटून सदर या परिसरातील फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यास सांगितले. मुख्याधिकारी यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना आदेशित करून फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. या परिसरातील फुटलेल्या जलवाहिनीचे कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. गंगापूर शहरातील नागरिकांच्या समस्या शासन दरबारी दैनिक आत्ताच एक्सप्रेसचे प्रतिनिधी वेळोवेळी मांडत असल्यामुळे नागरिकांनी सुभान शहा, यांचा अभिनंदन केला आहे. फुठलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती होत नव्हती त्यामुळे दैनिक आत्ताच एक्सप्रेस मध्ये ही बातमी प्रसिद्ध होताच नगरपालिका प्रशासन व ठेकेदाराने तात्काळ दखल घेत कामाला वेग दिला. फुटलेल्या पाईप लाईन ची दुरुस्ती करून ठप्प पडलेले रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.