Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादभारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची गंगापूर तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर... 

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची गंगापूर तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर… 

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची गंगापूर तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर… 

तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब वाघमारे उपाध्यक्षपदी फिरोज मन्सुरी तर कार्याध्यक्षपदी गुलाब वाघ यांची निवड…
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर येथे भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची गंगापूर तालुकास्तरीय पत्रकारांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली  (दि. १४ जाने) बुधवार रोजी पंचायत समिती सभागृहात बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय बन्सोड होते. यावेळी प्रदेश सचिव अयुब पटेल, मराठवाडा अध्यक्ष अलिम चाऊस, जिल्हाध्यक्ष शिवप्रसाद बन्सोड तसेच जिल्हा सचिव इब्राहिम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान
या बैठकीत सन २०२६ साठी गंगापूर तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये बाळासाहेब वाघमारे यांची तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली, तर लक्ष्मीकांत माघाडे यांची तालुका सचिवपदी निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष विजय बन्सोड व प्रदेश सचिव अयुब पटेल यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या प्रभावीपणे सोडवणे, संघटनेची ताकद वाढवणे तसेच पत्रकारितेतील मूल्ये आणि व्यावसायिक आचारसंहिता जपण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments