गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड यांचा कारभार चव्हाट्यावर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ बाबासाहेब रंगनाथ भोसले रा. वरखेड ता. गंगापूर यांनी मौजे रांजणगाव नरहरी गट.क्र. २१३ मधील शेत रस्ता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बंद केला आहे हा रस्ता मोकळा करून देण्यात यावी यासंदर्भात गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्याकडे अर्ज सादर केला होता. संदर्भ :- मंडळ अधिकारी मांजरी यांचा पंचनामा दिनांक १६/१२/२०२५ संदर्भीय कळविण्यात येते की, अर्जदार श्री बाबासाहेब रंगनाथ भोसले यांची मौजे रांजणगाव नरहरी गट.क्र.२१३ मध्ये रस्ता तहसीलदारांनी मोकळा करून देणे ही जबाबदारी तहसीलदारांची असून सुद्धा तहसीलदार यांनी त्यांना गट क्रमांक ८७ मधील शेतीत जाण्या-येण्यासाठीचा सरकारी रस्ता मोकळा करून देण्यासाठी तुम्हाला कायदेशीर दावा दाखल करावा लागेल अशी दिशाभूल करणारी सल्ला तहसीलदार नवनाथ गायकवाड यांनी शेतकऱ्याला दिली आहे. अशी माहिती बाबासाहेब रंगनाथ भोसले शेतकरी यांनी दिली आहे. तहसीलदार यांच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यावर तहसीलदारांनी रस्ता मोकळून करण्यात येणे अपेक्षित आहे परंतु शेतकऱ्याला दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न आता या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे .
शेतकऱ्याला तहसीलदार नवनाथ गायकवाड यांनी काय सल्ला दिली
अर्ज आपल्या कार्यालयात प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने आपल्या संदर्भीय अर्जाचे अवलोकन केले असता आपणास आपला रस्ता अडविलेला असल्यास या कार्यालयास मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ चे कलम ०५ अन्वये रस्ता मोकळा करणे बाबत अथवा आपणास नविन रस्ता हवा असल्यास महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये या कार्यालयास रितसर दावा दाखल करावा जेणेकरुन आपल्या प्रकरणात नियमानुसार निर्णय पारीत करण्यात येईल,
अशी सल्ला दिल्यामुळे शेतकऱ्याची उडाली धांदल शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे आता असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.