आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/गंगापूर नगरपालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर शहरातील पाणीपुरवठा ठप्प नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. मागील काही महिन्यापासून गंगापूर शहरातील पाणीपुरवठा वेळेनुसार होत नाही. काही प्रभागात आठ दिवसाला तर काही प्रभागात पंधरा दिवसाला तर काही ठिकाणी महिन्याला एका वेळेस पाणीपुरवठा होत असल्याचे बोलले जात आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा आठ ते दहा पंधरा दिवसानंतर एक वेळेस पाणीपुरवठा केला जातेय नदी आहे उशीला आणि कोरड आहे कशाला अशी परिस्थिती गंगापूर शहरातील नागरिकांची झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे प्रतिनिधी सुभान शहा यांनी पाणीपुरवठा अभियंता यांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. सदर पाणी वेळेनुसार होत नाही याची माहिती घेण्यासाठी पाणी सोडणारे कर्मचारी यांना देखील फोन करून माहिती विचारण्याचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यानी फोन उचलला नाही. यामुळे या ठिकाणी असं प्रश्न उपस्थित झाला आहे की. अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांचे फोन घेण्यास यांना वावडे आहेत का? व पाणीपुरवठा सुरळीत का केले जात नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. गंगापूर शहरातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जागोजागी फुटलेली आहे. नगरपालिकेच्या वतीने हे फुटलेली पाईपलाईन दुरुस्ती करण्यात येते परंतु ती पुन्हा नेहमी फुटत असते यामुळे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या दुरुस्ती करता येत नाही का? असं प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित झाला आहे. पाईपलाईन दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा ती पाईपलाईन फुटत असते याला कारण काय पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याची चर्चा देखील शहरांमध्ये सुरू आहे. नगरपालिकेच्या वतीने पाणी कधी सोडणार व नागरिकांना अस्वच्छ पाणीपुरवठा केला जात असल्याची शहरात चर्चा सुरू आहे.