आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर शहरातील बस स्टॅन्ड येथे मागील काही दिवसापासून बस स्टॅन्ड चे विकास काम सुरू असल्यामुळे प्रवासी यांना भर पावसाळ्यात व आता देखील पावसाळ्याचे दिवस संपले आहे तरीसुद्धा परवासीयांना बसण्यासाठी व सावळीची व्यवस्था नसल्यामुळे व. तसेच एसटी बसेस वर बोर्ड नसल्यामुळे प्रवाशांना गाडी कुठे जाणार हे कळत नसल्याने प्रवासांना वाहक चालक यांना विचारावा लागत होते की ही गाडी कुठे जाणार आहे. गाडीवर बोर्ड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याची बातमी दैनिक आत्ताच एक्सप्रेस ला प्रसिद्ध करण्यात आली होती बातमी प्रसिद्ध करताच एसटी महामंडळाला आली जाग. गंगापूर बस स्टॅन्ड येथे प्रवाशांना सध्या कोणतीही सोय सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. गंगापूर तालुक्यातील मोठं बस स्टॅन्ड असूनदेखील प्रवाशांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाही. आणि दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी या ठिकाणी एसटी बसमध्ये प्रवास करत असतात परंतु गंगापूर बस स्टँड वरील विकास काम तात्काळ पूर्ण करून प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल महामंडळाचे नागरिकाकडून अभिनंदन केले जात असल्याची चर्चा आहे.