आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर शहरातील वैजापूर रोडवरील स्ट्रीटलाईटचे काम पूर्ण झाल्यानंतर या कामाचे उद्घाटन दि.१३ अगस्ट २०२२ रोजी रात्री नऊ वाजता विठ्ठल आश्रम येथील ह.भ.प. गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांच्या हस्ते स्ट्रिटलाईट चे पुजन करून बटन चालू करून स्ट्रिटलाईट चालू करण्यात आले होते. मोजके चार ते आठ दिवस लाईट चालू राहिली नंतर काही दिवस लाईट बंद असल्यामुळे या ठिकाणी रोडवर अपघात देखील झालेले होते. तसेच पुन्हा काही दिवसानंतर लाईट चालू करण्यात आली काही दिवस लाईट चालू राहिली पुन्हा लाईट बंद झाली याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. सध्या सना सुदिचे दिवस सुरू आहे. मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी लाईट चालू नसल्यामुळे चोऱ्या अपघात असे काही दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासन लक्ष करणार का? मुख्य रस्त्यावरील स्ट्रिटलाईट सुरळीत चालू होणार का? प्रशासनाला लवकरात लवकर मुख्य रस्त्यावरील स्ट्रिटलाईट चालू करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकाकडून जोर धरत आहे. या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.