गंगापूर शहरातील नागरिकांच्या वतीने मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावी या करीता गंगापूर शहरातील काही जागरूक नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांना निवेदन देऊन मागणी केली असतां मुख्यधिकरी यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर झालेल्या खड्ड्याची पाहाणी करुन संबंधित कर्मचाऱ्यांना खड्डे बुजवून्याची सक्त आदेश दिले ..यावेळी सुर्यकांत थोरात , मंगेश जोशी ,बापु खाजेकर, एड महेंद राऊत, टिळे आंबा,सौ कावेरी ताई पाहुणे, अहमद पटेल,असिफ मन्सुरी, ज्ञानेश्वर पवार ,रामेश्वर जाधव,संजय राऊत ,आब्बु चाऊस,गंगापूर शहारातील सुज्ञ नागरीक उपस्थित होते, नागरिकांच्या काय आहे मागण्या अहिल्यानगर ते मनमाड रोड बंद असेल्याकारणाने सर्व वाहतूक गंगापूर मार्गे वळविण्यात आली असून कायगाव रोड वरील संत सावता महाराज मंदीर समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानसमोर, राजीव गांधी चौकात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात खूप मोठे खड्डे पडलेले आहे. दिनांक (१७) सप्टेंबर रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील खोल खड्यात ट्रकचे टायर फसलेले होतो. आणि सदर ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले सुदयवाने कोणलाही ईजा झाली नाही पण या खड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहेे. यासाठी समस्त गंगापूरकर आता आक्रमक झाले असून साखर झोपेत असलेले नगर परिषद प्रशासनास जागी करण्यासाठी निवेदन देत आहोत की डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते कायगाव रोडवरील संत सावता महाराज मंदीर पर्यन्त पडलेले सर्व खड्डे उद्या शुक्रवार पर्यंत बुजवावे अन्यथा आम्ही समस्त गंगापूरकर शनिवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्तारोको आदोलन करू असा इशारा दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.