गंगापूर जि.प. शाळेच्या मैदानावर गाथामूर्ती रामभाऊ महाराज राउत यांच्या हस्ते ध्वजपूजन
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर शहरामध्ये दि. १४ ते २० मे दरम्यान प्रसिध्द कथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये दररोज सहा हजारावर भाविकांना प्रसादाचे नियोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे ध्वजपूजन दि. १३ रोजी गाथामूर्ती रामभाऊ महाराज राउत यांच्या हस्ते करण्यात आले.
यासंदर्भात कथेचे आयोजक माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, जिल्हा परिषदेच्या मैदानावर १४ ते २० मे दरम्यान सायंकाळी ६.३० ते ९.३० कथा होणार असून दररोज कथा संपल्यानंतर महाप्रसाद होणार आहे. दि. २० मे रोजी कथेची सांगता होणार असून सायं. ४ ते ६ शहरातून भव्य मिरवणुक होणार आहे. या कथेसाठी आ. सतीश चव्हाण, अप्पासाहेब हिवाळे, रामेश्वर मुंदडा, संजय होळकर, राजेंद्र जंजाळ,गोपाळ राऊत, दिपक कदम, सुरेश नेमाडे, रामेश्वर नावंदर यांचे सहकार्य लाभले आहे.याशिवाय संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ, अमोल जगताप, संदीप साबणे, सुधीर माने, पोपट परभणे, सचिन सोनवणे, योगेश आंबेकर, काकासाहेब धोंडरे, दिलिप बनकर, अविनाश पाटील, दिलिप निरफळ, आबासाहेब सिरसाठ, अविनाश सोनवणे, नवनाथ कानडे, यांनी कथेसाठी मदत केली असून कथेच्या आयोजनासाठी संतोष अंबिलवादे, कृष्णा पाटील, दिनेश गायकवाड, तुकाराम सटाले, सोपान देशमुख योगेश पाटील यांच्यासह आयोजन कमिटीतील सदस्य परिस्रम घेत आहे.