अण्णासाहेब शिंदे यांनी भूषवले.यावेळी बोलताना शाळेने इयत्ता १०वी ची १००% टक्के यशाची परंपरा सलग नऊ वर्ष पासून कायम ठेवली असून तसेच कन्नड शहरातील ऐकमेव डोंगरी विभागातील इंग्रजी माध्यमाची शाळा आहे असे प्रतिप्राधन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून *प्राध्यापक संजय गायकवाड सर,आणि पत्रकार मोरास्कर साहेब यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जीवनात यशाचे शिखर गाठण्यासाठी स्वप्न डोळ्यासमोर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर ते पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असायला पाहिजे असे सांगून, वाचन, चिंतन आणि मनन या तीन गोष्टी देखील विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे परिवर्तन घडवू शकतात याची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून सांगितले*. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शाळेतील शिक्षकांवर किती मोठी जबाबदारी असते याबद्दल देखील माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आण्णासाहेब शिंदे, मुख्याध्यापक प्रा. श्रीकांत झिंजुर्डे,शाळेचे संचालक संदीप शिंदे,शाळेचे व्यवस्थापक उदय सोनवणे,शिक्षक शुभांगी पठाडे,दुर्गा काळे,योगिता मोरे,रुपाली शेजवळ,प्रियंका छत्रे, वर्षा निकम,जयश्री वाडिले,छाया हिंगे,प्रतिक्षा सुमराव,इशिता शर्मा,पूजा वाळुंजे,धीरज राठोड,अनिकेत गोंडे, तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.