गणेशोत्सव ईद- ए- मिलाद सने आनंदात साजरे करा.तहसीलदार श्री.विद्याचरण कडवकरांचे नागरिकांना आव्हान
कन्नड/ कन्नड शहर पोलीस दलाचे व तहसील कार्यालयात तहसीलदार श्री.विद्याचरण कडवकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलतांना तहसीलदार श्री.कडवकर यांनी नागरिकांना असे सूचित केले की,येऊ घातलेल्या श्री.गणेशोत्सव व ईद – ए-मिलाद ही दोन्हीही आनंदी सने एकाच वेळी आली असुन ती अगदी प्रत्येकाने आनंदाने साजरी करावी, कुठेही शांततेचा भंग होणार नाही,याची प्रत्येकानेच काळजी घ्यावी,असेही आव्हान या आयोजीत शांतता बैठकी दरम्यान केले आहे.
ते पुढे असेही म्हणले की,जर या आनंदी उत्सवात कोन्हीही विघ्न
किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांचेवर मोठ्यातली मोठी कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.धीरज चव्हाण,शहर पोलीस निरीक्षक श्री.रघुनाथ सानप,गणेश महासंघाचे अध्यक्ष श्री. साईनाथ आल्हाड,सहाय्यक पोलीस निरीक्षकश्री.कुणाल सूर्यवंशी,श्री.चांद मेंडके,महावितरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री.राठोड,या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.तर बैठकी दरम्यान मा.नगराध्यक्ष डॉ.सादाशिव पाटील,यांनी शहरातील मोकाट जनावरे,श्री.राजेंद्र गव्हाणे यांनी विधुत पुरवठ्या संभदी तर संदेश पवारांनी शहरातील स्वच्छते बाबत काही प्रश्नउपस्थित केले.त्यावर तहसीलदारांनी तात्काळ कार्यवाईचे आदेश संबंधीत यंत्रनेस दिल्या जाईल असे उपस्थितांना सूचित केले.या वेळी पो.नि.सनपांनी आपले विचार माडतांना उत्सव काळात कोन्हीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊन विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस दलाच्या वतीने त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.धीरज चव्हाण,गणेश महासंघाचे अध्यक्ष साईनाथ आल्हाड यांनीही आपले विचार प्रगट करून दोन्हीही सने आनंदाने व शांततेत साजरे करण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे.या वेळी भाजपाचे मध्य मंडळ प्रमुख राम पवार,प्रकाश कचोळे, सिद्धार्थ निकाळजे विकास बागुल या सह पोलीस दल,तहसील,नगरपरिषद कार्यालयाचे अनेक कर्मचारी वर्ग शहरातील समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.