अॅग्रीस्टॅक’ योजनेची माहिती देत तलाठी गणेश लोणे यांनी केली शेतकऱ्यांमध्ये जनजागृती
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ गंगापुर आठवडी बाजारात थेट तलाठी गणेश लोणे यांनी शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ‘अॅग्रीस्टेंक’ या नव्या डिजिटल ओळख प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली असून, गंगापुरचे तलाठी गणेश लोणे हे आठवडी बाजारात जनजागृती करत असताना दिसुन आले. या उपक्रमात शेतकऱ्यांना युनिक ओळख क्रमांक घेण्यासाठी मार्गदर्शन केले जात होते. अॅग्रीस्टॅक म्हणजे काय? ‘अॅग्रीस्टॅक’ ही केंद्र शासनाची डिजिटल ओळख प्रणाली असून, यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक क्रमांक दिला जातो. या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत, खत बियाण्यांवरील अनुदान अशा विविध योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. या योजनेचे फायदे पुढीलप्रमाणेः थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.): सर्व अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप टळेल. कर्ज व विम्यासाठी सुलभ प्रक्रियाः शेतकऱ्यांना पुन्हा कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. अॅग्रीस्टॅकवरील नोंदींवर आधारितच प्रक्रिया होणार असल्याने मंजुरी अधिक वेगाने होईल. अनुदान व शेतीसंबंधित सेवाः खत, बियाणे, औषधे, हवामान अंदाज, मृदा चाचणी, सिंचन योजना यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. आपत्तीमधील तत्काळ मदतः दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई लवकर मिळेल, कारण शेतकऱ्यांची माहिती आधीच सिस्टममध्ये उपलब्ध असेल.