फुलंब्री तालुका भाजपा संघटनात्मक निवडणुका संपन्नफुलंब्री / प्रतिनिधी / फुलंब्री भाजपा तालुका संगटनात्मक मंडळाचे अध्यक्ष म्हणून वारेगाव येथील सुचित बोरसे यांची तर वडोद बाजार मंडळाचे अध्यक्ष म्हणून उपसरपंच गोपाल वाघ पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सुचित बोरसे व गोपाल वाघ हे दोघेही मागील सहा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस म्हणून काम बघत होते. सुचित बोरसे यांनी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेले आहे. तालुक्याचे दोन्हीही सरचिटणीस दोन्ही मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली . त्याप्रसंगी त्यांचे अभिनंदन करताना फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधा चव्हाण , पक्ष निरीक्षक ज्ञानेश्वर मोटे फुलंब्री तालुकाध्यक्ष सांडू आण्णा जाधव , कल्याण चव्हाण , नरेंद्र देशमुख , अल्पसंख्यक औरंगाबाद जिल्हाध्यक्ष इलियास शहा , बाळू सोटम , राजेंद्र डकले , आप्पासाहेब काकडे , एकनाथ धटिंग , बाळू तांदळे , भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ , गजानन नागरे , बाबासाहेब शिनगारे , कैलास सोनवणे , नाथा काकडे , रोशन अवसरमल, आण्णा सातपुते , अरुण गाडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .
