फुलवाडी शिवारात शेत रस्त्या अभावी शेतकऱ्यांचे हाल – पाणंद रस्ते करण्याची शेतकऱ्यांची मागणी
दैनिक आताच एक्स्प्रेस
फुलवाडी/प्रतिनिधी/ फुलवाडी शिवारात शेत – रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली – असून शेतकऱ्यांचे रस्त्याअभावी – हाल होत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांचे होत असलेले हाल – पाहता पाणंद रस्त्यांचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी – शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.परतुर तालुक्यातील मौजे फुलवाडी शिवारात अद्यापही बरेच पाणंद रस्ते करण्यात आले नाहीत. पूर्वीच्याच – रस्त्यावरून शेतकऱ्यांना शेतात – ये-जा करावी लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने -चिखलमय रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झाले आहेत. रस्त्यावर चिखलच चिखल पुर्ण- झाला आहे. काही ठिकाणी तर जवळपास चार ते पाच जागेवर चिखल साचल्याने डेरे शेतात जाणे शक्य होत – नाही. चिखलयुक्त रस्त्यावरून बैलगाडी ओढतांना बैलांना देखील खूप कसरतच होतीय तसेच शेतकऱ्यांना शेतात य जा-करताना अतोनात त्रास सहन करावा लागत – आहे.
