फुलंब्री नगरपंचायतीच्या हद्दीतील बाहेर च्या मतदारांची नावे कायम , बोगस मतदान घेऊन निवडणुक जिंकणार का ?
तब्बल ८५५ नागरिकांचे नाव कायम त्यांचा शहराशी काही संबंध नाही,
फुलंब्री/प्रतिनिधी/ आगामी फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या १७वॉर्डाच्या अंतिम मतदार यादीवरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रारूप यादीवर एकूण ४,३०१ आक्षेप दाखल झाले होते. त्यापैकी ३,११७ आक्षेप प्रशासनाने मान्य केले, तर १,१८४ आक्षेप अपुरे पुरावे वा तथ्यांअभावी फेटाळले.
मात्र, यादीत अजूनही ८५५ मतदारांची नावे अशा व्यक्तींची आहेत, ज्यांचा फुलंब्री शहराशी किंवा तालुक्याशी संबंधच नाही. त्यामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या संख्येने त्रुटींवर आक्षेप नोंदवले. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात, चुकीचे पत्ते, तसेच बाहेरच्या गावातील नावे आढळली. प्रशासनाने प्रत्यक्ष तपासणी करून ३ हजार ११७
आक्षेप योग्य ठरवले, तर १ हजार १८४ आक्षेप पुराव्याअभावी बाद केले. ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी नगरपंचायत कार्यालयात ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली.
८ वर्षांत ३ हजार ५०६ मतदार वाढले
सध्या १७ वॉर्डात एकूण १७,६३० मतदार नोंदले गेले आहेत. २०१७ मध्ये ही संख्या १४ हजार १२४ इतकी होती. नव्याने शहर हद्दीत आलेल्या पानवाडी गावातील १ हजार २०० मतदारांमुळे या वाढीला हातभार लागला आहे.
दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ८५५ बाहेरच्या मतदारांची, ६०० दुबार मतदारांची आणि १४३ मयत मतदारांची नावे असल्याचे दाखवून दिले होते. मात्र, अंतिम यादीत ‘बाहेरच्यांची’ नावे कायम राहिल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे.
दुबार आणि मयत मतदारांवर कारवाई सुरू
प्रशासनाने दुबार नावांची स्वतंत्र यादी तयार केली असून, संबंधितांना नोटीस पाठवली जाणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर मतदारांना एका प्रभागाची निवड करावी लागेल; अन्यथा त्यांच्या नावासमोर ‘दुबार’ अशी नोंद होईल. तसेच मयत मतदारांच्या नावासमोर ‘मयत’ असा शिक्का मारण्यात येणार आहे.
वॉर्डनिहाय मतदारसंख्या
वॉर्ड १ – १०८४, वॉर्ड २ ९९९, वॉर्ड ३ -६३१, वॉर्ड ४ १०३९, वॉर्ड ५- १२०८, वॉर्ड ६ १४०८, वॉर्ड ७ ९७०, वॉर्ड ८ – ११९४, वॉर्ड ९ १०७६, वॉर्ड १० – ११८६, वॉर्ड ११ ८३४, वॉर्ड १२ – १०७८, वॉर्ड १३ – ९३३, वॉर्ड १४ १३१७, वॉर्ड १५ १०४८, वॉर्ड १६ ७७६, वॉर्ड १७ – ८४९ – एकूण मतदारसंख्या १७ हजार ६३०.
*दुबार नाव हटवण्यस आम्हाला आधिकार नाही, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे*
फुलंब्री शहरातील नगरपंचायत हद्दीत वार्ड वार्ड मध्ये जे बाहेर च्या मतदारांची नावे आहे ती हटवावा यासाठी काही नागरिकांनी तक्रार केली आहे, ती हटवावा अशी मागणी केली आहे. पण या संदर्भात दैनिक आत्ताच एक्स्प्रेस फुलंब्री प्रतिनिधी सरफराज पटेल यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना संपर्क साधुन माहिती घेतली असता ते म्हणाले की जी दुबार नाव आहे ते हटवण्यस आम्हाला आधिकार नाही, त्यांच्या नावां समोर डबल फुली देण्यात येईल.या साठी माहिती पण देऊ.