फुलंब्रीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वाचनालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न
फुलंब्री /प्रतिनिधी/फुलंब्री शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब अंबेडकर पुतळा परिसरातील सभागृहात काल दिनांक ११ मे रोजी नगरपंचायतीच्या वतीने वाचनालय सुरू करण्यात आले. या प्रमुख कार्यक्रमाला जालना लोकसभेचे खासदार डॉ कल्याण काळे व फुलंब्री तालुक्याच्या आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांची उपस्थिती होती.
तसेच यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
वाचनसंस्कृतीला चालना देणारे आणि नव्या पिढीला सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारे हे वाचनालय आता नागरिकांसाठी खुले झाले आहे.
यावेळी खासदार .कल्याण काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष .सुहास सिरसाट , मुख्याध्यकारी.ऋषिकेश भालेराव, .शिवाजी पाथ्रीकर, .सर्जेराव मेटे, कल्याण चव्हाण, कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, .सूचित बोरसे, योगेश मिसाळ, .बाळासाहेब तांदळे .गजानन नागरे, .राजुभाऊ प्रधान , जमीर पठाण, दिलीप गंगावणे, अजय गंगावणे, नितीन देशमुख , बाळासाहेब तांदले यांच्या सह कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती