फुलंब्री शहरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
फुलंब्री /प्रतिनिधी /फुलंब्री शहरात काल दिनांक १४ एप्रील रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, या जयंती च्या निमीत्ताने शहरात शांतेत रैली काढण्यात आली होती.
दोन डीजे लावुन गाणे वाजवत फुलंब्री शहर भीमवय करण्यात आले होते, चोहीकडे निळे झेंडे लावत, शहरात निळेमय वातावरण करण्यात आले होते.
तसेच रात्री ११ वाजेच्या दरम्यान शहरातील नागरिकांना जेवणाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने समाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.
सगळीकडे भीम गिते गात, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांची जय संविधान सेकुलरिज्म जिंदाबाद अशी घोषणा देत परिसर दणाणुन सोडण्यात आला होता.
जयंती उत्साहात मुस्लिम बौद्ध व हिन्दू समाज बांधव सर्वच सहभागी झाले होते, फूलंब्री शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले, या प्रसंगी माजी सभापती पंचायत समिती जेपी शेजवळ , डॉ हिवराळे , रोशन अवसरमल, संजय मोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, माजी नगरसेविका पती उमेश दुतोंडे, अय्युब पटेल, भगवान गंगावणे, अजय गंगावणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार शहराध्यक्ष अजहर पटेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी चे हरिदास घडामोडे, रिजवान खान, उत्तम ढोके, भाजपा शहराध्यक्ष वाल्मीक जाधव , सुरेश प्रधान, गजानन नागरे, गणेश राऊत, जमीर पठाण, दिलीप गंगावणे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.