Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादएमजीएममध्ये ‘फिजिकॉन २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री...

एमजीएममध्ये ‘फिजिकॉन २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार परिषदेचे उद्घाटन

एमजीएममध्ये ‘फिजिकॉन २०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार परिषदेचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर- एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपी आणि एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एमजीएम फिजिकॉन २०२५’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय फिजिओथेरपी परिषदेचे शनिवार दिनांक, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुक्मिणी सभागृह येथे उद्घाटन होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, सचिव अंकुशराव कदम, एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता डॉ.प्रविण सूर्यवंशी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित असणार आहेत.

‘एमजीएम फिजिकॉन २०२५’ ही आंतरराष्ट्रीय परिषद शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ आणि रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ असे दोन दिवस असणार आहे. ‘इम्पावरिंग मुव्हमेंट’ या अर्थपूर्ण संकल्पनेवर आधारित या परिषदेचा उद्देश फिजिओथेरपी या मानवी शरीराच्या हालचाली पुनर्स्थापित करणाऱ्या आणि बळकट करणाऱ्या विज्ञानाच्या नव्या दिशांना अधोरेखित करणे हा आहे.

या दोन दिवसीय परिषदेत देश-विदेशातील १६ मान्यवर तज्ञ फिजिओथेरपी क्षेत्रातील नव्या संकल्पना, संशोधन आणि उपचार पद्धतींवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये, डॉ.आनंद बंग, डॉ. सिंथिया श्रीकेसवन, डॉ.अशोकन अरुमुगम, डॉ.करेन फिट, आणि डॉ. सौरभ शर्मा यांसारख्या ख्यातनाम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सहभाग असणार आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत देशभरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी, प्राध्यापक, तज्ञ आणि संशोधकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.सरथ बाबू, प्राचार्य डॉ. रिंकल मलानी आणि संयोजक डॉ. प्रेरणा दळवी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments