Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादनगरपरिषदेकडून फलाहे दारैन संस्थेला इमारत भाडे न भरल्याप्रकरणी नोटीस

नगरपरिषदेकडून फलाहे दारैन संस्थेला इमारत भाडे न भरल्याप्रकरणी नोटीस

नगरपरिषदेकडून फलाहे दारैन संस्थेला इमारत भाडे न भरल्याप्रकरणी नोटीस

खुलताबाद/प्रतिनिधी/  खुलताबाद-येथील नगरपरिषदेने फलाहे दारैन एज्युकेशन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर संस्थेस,नगरपरिषद इमारतीचे भाडे न भरल्याबाबत नोटीस दिली आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार,१८ ऑगस्ट २००६ रोजी नगरपरिषदेची इमारत नियमित प्रक्रियेद्वारे संस्थेच्या ताब्यात देण्यात आली होती.त्यानंतर एक सप्टेंबर २००६ पासून इमारत भाडे तत्वावर संस्थेकडे देण्यात आली.त्यावेळी ठरविलेल्या अटी व शर्तींनुसार,नगरपरिषदेला वार्षिक भाडे भरणे अनिवार्य होते.
परंतु नगरपरिषदेच्या म्हणण्यानुसार,सदरील संस्थेने दीर्घकाळापासून भाडे भरणा केलेला नाही.अनेक वेळा लेखी व तोंडी सूचना देऊनही भाडे न भरल्याने,करारनाम्याची मुदतदेखील संपुष्टात आली आहे.त्यामुळे नगरपरिषदेकडून आता पुढील कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नगरपरिषदेने नमूद केले आहे की,जर संस्थेला सदर इमारत पुढेही वापरण्याची इच्छा असेल,तर मार्च २६ अखेरपर्यंतचे एकूण ₹११ लाख,५१ हजार,२३८ (अकरा लाख एकावन्न हजार दोनशे अडुत्तीस रुपये) भाडे अदा करावे लागेल.तसेच मुदतवाढीसाठी नवीन कराराचा प्रस्ताव नगरपरिषदेत दाखल करावा,अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या मागणी तक्त्यानुसार,एप्रिल २३ ते मार्च २६ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण भाडे थकबाकी ₹२५,२२,२३८ इतकी आहे.यापैकी १३ लाख,७१,हजार इतकी रक्कम भरली असून उर्वरित ११,लाख ५१ हजार,२३८ रु.थकबाकी अद्याप बाकी आहे.
नगरपरिषदेने शेवटी स्पष्ट इशारा दिला आहे की,जर ठरविलेल्या कालावधीत थकबाकीची संपूर्ण रक्कम भरली गेली नाही,तर भाडे तत्वावरील इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच यापुढे मुदतवाढीसाठी नवीन प्रस्ताव दाखल न केल्यास, नगरपरिषदेला इमारत परत घेण्याचा अधिकार राहील.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments