ईदगाह कमिटीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरैशी यांचा जाहिर सत्कार
खुलताबाद/ प्रतिनिधी/ खुलताबाद शहराचे माजी उपनगराध्यक्ष तथा कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सलीम कुरैशी यांनी नुकताच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर शुक्रवारी शहरातील ईदगाह कमिटीच्या वतीने त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात ईदगाह कमिटीचे अध्यक्ष शेख सलीमोद्दीन यांच्या हस्ते सलीम कुरैशी यांना शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी शहराचे माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग, दर्गा शेख जलालुद्दीन गंजे रवां कमिटीचे माजी अध्यक्ष मोहम्मद असलम, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल मजीद मणियार, माजी नगरसेवक डॉ. मोहिनोद्दीन कादरी, सय्यद शौकत अली, शेख नईम, मुजीब उर रहमान,शेख अस्लम, मोहम्मद रईस मुजावर, युसुफ अलीयर खान यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या आयोजना बद्दल सलीमम कुरैशी यांनी उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सलीम कुरैशी यांच्या राजकीय वाटचालीस यश मिळो, अशा शुभेच्छा ईदगाह कमिटीच्या वतीने देण्यात आल्या.
