एकनाथ महाजन यांच्या कडून दिव्यांग विद्यार्थ्याना स्वेटर वाटप
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ दिव्यांग सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय शाळा सोयगाव येथिल दिव्यांग विद्यार्थ्याना ठंडीपासून संरक्षण बचाव व्हावा म्हणून अंध अपंग कल्याणचा,घेतला आहे वसा विकास सर्वांगीण साऱ्यांचा,कोण कोठे असो कसा|| बहिण बंधू आपले सारे, नाते जोडू कायमचे जीवन त्यांचे सुखी कराया, कर सरसावू सहयोगाचे
या वरील उक्ती प्रमाणे प्रशाला सोयगाव येथिल माजी मुख्याध्यापक तथा माजी नगरसेवक,समाजसेवक एकनाथ महाजन सर स्वेटर माजी विद्यार्थी संघाचे ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्बं हर्षल काळे,राजेंद्र दुतोडे,अण्णाभाऊ वाघ,रविंद्र साखळे पालक सुधाकर सोहनी याच्या हस्ते बुधवारी (दि .१०) करण्यात आले यावेळी दिव्यांग विद्यार्थ्याच्या चेहर्यावर आनंद दिसुन येत होता यावेळी शाळेतील मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,पदवीधर शिक्षिका सुरेखा चौधरी,पंकज रगडे सहशिक्षिका मंगला बोरसे, सविता पाटील,अकुश काळे,गणेश बाविस्कर,अनिल देसाई,तानाजी जाधव,शुभम देसले,पुनम लाड उपस्थित होते.