ईद ए मिलाद निमित्त पात्रूड येथे एम आय एमच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
पात्रूड/प्रतिनिधी/ आज पात्रूड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ईद-ए-मिलाद निमित्त ऑल इंडिया मजलीसे इतेहादुल मुस्लिमिन AIMIM पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.ईद-ए-मिलाद निमित्त पात्रूड येथे उत्साहात मिरवणूक काढण्यात आली तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व समाजातील लोकांनी उत्साहात ईद-ए-मिलाद साजरा केला त्यानंतर दुपारी एक वाजेनंतर दरवर्षीप्रमाणे एम आय एम पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले एमआयएम चे जिल्हा उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य शेख युसुफ, ग्रामपंचायत सदस्य इरफान शाह,माजी ग्रामपंचायत सदस्य कुरेशी जफर, मोमीन तमीम, शेख बब्बू,नासिर अबदार,शेख सोहेल,कुरेशी अजहर,शेख नवीद,सय्यद मुन्ना,युसूफ सौदागर, शेख नजमु, शेख असेफ,शेख अझर, रफिक शाह, खुरेशी मुन्ना,शेख गौस,सिटी ब्लड बैंकचे नौशाद भाई, शोएब भाई,तसेच गावातील तरुणांनी सहभाग घेऊन कार्यकम यशस्वीरित्या पार पाडला. माजलगावचे नगरसेवक ईद्रीस पाशा, युनूस शेख, समीर शेख यांनी रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट दिली.शेख युसूफ यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य करणारे सर्वांचे आभार मानले.