भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. गंगनाथन यांची पंचसुत्री हे मोठी देण
केज/ प्रतिनिधी/ स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज जि. बीड येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती व्याख्यान व चर्चासत्र कार्यक्रम घेवून दिनांक १२ – ०८ – २०२५ रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून आनंद (भैय्या) गायकवाड हे होते.
व्याख्यान देताना ते म्हणाले कि, डॉ. एस. आर. रंगनाथन हे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत. त्यांनी मांडलेली पंचसुत्री हा गंथालय शास्त्राचा प्राण आहे. त्यांनी मांडलेली पंचसुत्री हि मोठी देण आहे, डॉ. एस. आर. रंगनाथन मांडलेली पंचसुत्री म्हणजे Ruls of 5 law चा नावाने आळखले जाते.
१) ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत
2) प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीचा व त्याला हवा असलेला ग्रंथ मिळाला पाहिजे.
3) प्रत्येक ग्रंथाला योग्य वाचक मिळाला पाहिजे
४ ) ग्रंथालय कर्मचा-यांचा व वाचकांचा वेळ वाचला पाहिजे.
५) ग्रंथालय हि .वर्धिष्णू संस्था आहे.
हि देशाला व ग्रंथालय चळवळीला डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी दिलेली अजरामर देण आहे यावरच
१) शालेय – महाविद्यालय – विद्या पिठिय ग्रंथालये
2) सार्वजनिक ग्रंथालये
3 ) संशोधन ग्रंथालये
४ ). राष्ट्रीय ग्रंथालये
यांचा ग्रंथालयीन ढाचा अवलंबून आहे असे प्रतिपादन आनंद( भैय्या) गायकवाड यांनी केले.
त्यानंतर एस. के. वैरागे यांचेही थोडक्यात व्याख्यान झाले.
त्यानंतर घेण्यात आलेल्या चर्चासत्रात पांडूरंग गायकवाड, भागवत पौळ, बाळासाहेब गायकवाड, बबन पुंड यांनी मनोगत मांडले.
दान्ही सत्राच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, ख्यातनाम वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड हे होते.
अध्यक्षीय समारोपात डॉ. एस. आर. रंगनायन यांचा जिवन – परिचय व कार्य यावर प्रकाश टाकला
डॉ. एस. आर. रंगनाथन हे father of law (फादर ऑफ लॉ) असल्याचे सांगून त्यांच्या ग्रंथालयीन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला
डॉ. एस. आर. रंगनाथन महान विभूती होवून गेले असे प्रतिपादन डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड यांनी अध्यकीय समारोप प्रसंगी प्रतिपादन केले
यावेळी माजी सरपंच रामराजे गायकवाड, माजी ग्रा.पं. सदस्य रमेश गायकवाड, आर. ए. गायकवाड, अमोल गायकवाड, नानासाहेब जाधव, आरुण गायकवाड यांच्यासह वाचक, हितचिंतक यांची उपस्थिती होती.