Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादडॉ.लक्ष्मी भारती यांना राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान

डॉ.लक्ष्मी भारती यांना राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान

डॉ.लक्ष्मी भारती यांना राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान

खुलताबाद/प्रतिनिधी/  खुलताबाद येथील महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदीप विद्या मंदिर या शाळेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.लक्ष्मी भारती यांना राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. डॉ. लक्ष्मी भारती यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेवून वाय.एस.एस.फाउंडेशन, रिटायर्ड आर्मी ऑफिसर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एन.डी. एम.सी.सेंटर दिल्ली या ठिकाणी वायुसेनेचे कॅप्टन रमेशचंद्र पाठक यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.गोल्ड मेडल, ट्रॉफी,प्रमाणपत्र,शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी वायुसेनेचे कॅप्टन रमेशचंद्र पाठक, कॅप्टन करणपाल सिंग,दिल्ली पोलीसचे वरिष्ठ अधिकारी रोहिदास कुमार, मेजर श्री.सक्सेना,कमल चौधरी यासह भारतीय सेनेचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.देशसेवेसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या महान योद्धा कडून पुरस्कार स्विकारताना मन आनंदाने गहिवरून आल्याची भावना डॉ.लक्ष्मी भारती यांनी यावेळी व्यक्त केली. हा पुरस्कार मिळाल्याने डॉ.लक्ष्मी भारती यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments