Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुक मार्गात बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुक मार्गात बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुक मार्गात बदल

 जालना: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही साजरी करण्यात येणार आहे. सोमवार, दि. 14 एप्रिल, 2025 रोजी जालना शहरात देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पोलीस विभागाने जालना शहरात मिरवणुकीच्यावेळी अडथथ निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा रहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने वाहतुकीच्या नियमनासाठी या मार्गावरील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.

यामध्ये मोतीबागकडून शनिमंदीर गांधीचमन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड, मंमादेवी मार्गे नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही मोतीबाग, सिटीझन टी पॉईन्ट, भोकरदन नाका, बसस्थानक या मार्गे जाईल व येईल.अंबड चौफुली नुतन वसाहत कडुन शनिमंदीर, गांधीचमन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड, मंमादेवी मार्गे नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही मोतीबाग, सिटीझन टी पॉईन्ट, भोकरदन नाका, बसस्थानक यामार्गे जाईल व येईल. रेल्वे स्टेशन, नगर परीषद, गांधीचमन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड, मंमादेवी मार्गे नविन जालनामध्ये जाणारी वाहतुक ही रेल्वे स्टेशन, नुतन वसाहत, अंबड चौफुली, मंठा चौफुली, नाव्हा चौफुली, जिजामाता प्रवेशद्वारमार्गे जाईल व येईल. माळीपुरा, दिपक हॉस्पीटल, टाऊन हॉल परीसरातील गांधी चमन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड, मंमादेवी मार्गे नविन जालनामध्ये जाणारी वाहतुक ही दिपक हॉस्पीटल जवळुन जामा मस्जीद चौक, कैकाडी मोहल्ला, राजाबाग सवार दर्गा, रामतीर्थ मार्गे किंवा जामा मस्जीद चौक, विठ्ठल मंदीर, पेशवे चौक, लक्कड कोट किंवा गांधी चमन, विठ्ठल मंदीर, पेशवे चौक, लक्कड कोटमार्गे जाईल व येईल.रेल्वे स्टेशन, निरामय हॉस्पीटल, मंमादेवीमार्गे नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही निरामय हॉस्पीटल जवळुन सुभद्रा नगर, ग्लोबल गुरुकुल, मंठा चौफुली, नाव्हा चौफुली, जिजामाता प्रवेशद्वारमार्गे जाईल व येईल.बसस्थानकावरुन, फुलंब्रीकर नाट्यगृह आणि ट्राफीक ऑफीस रोडकडुन येणारी व सुभाष चौक मार्गे मंमादेवी, जुना जालनामध्ये जाणारी वाहतुक ही बसस्थानकवरुन, लक्कडकोट, पेशवे चौक, विठ्ठल मंदीर, गांधी चमन किंवा जामा मस्जीद चौक, दिपक हॉस्पीटल किंवा रामतीर्थ, राजाबाग सवार दर्गा, कैकाडी मोहल्ला, जामा मस्जीद चौक मार्गे जाईल व येईल.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुर्तीवेस, काद्राबाद पोलीस चौकी, पाणीवेस, गरीबशहा बाजार किंवा सुभाषचौक मार्गे मंमादेवी, जुना जालनामध्ये जाणारी वाहतुक ही गुरु गोविंदसींग नगर, रामनगर, गांधी नगर, बायपास रोड अंबड चौफुली नुतन वसाहत मार्गे जाईल किंवा मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन, ती सिविल गुरुकुल, अंबड चौफुली, नुतन वसाहतमार्गे जाईल. किंवा मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन सुभद्रा नगर, सोनल नगर, निरामय हॉस्पीटलमार्गे जाईल व येईल.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नारायणा स्कुल, मंगळ बाजार, काद्राबाद पोलीस चौकीमार्गे पाणीवेसकडे येणारी वाहतुक मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन, ग्लोबल गुरुकुल, अंबड चौफुली, नुतन वसाहतमार्गे’ जाईल. किंवा मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन सुभद्रा नगर, सोनल नगर, निरामय हॉस्पीटलमार्गे जाईल व येईल.सदर बाजार, सिंधी बाजार, रहेमान गंज, कडुन येणारी व मामा चौक मार्गे, सुभाष चौक, मंमादेवी जुना जालना मध्ये जाणारी वाहतुक ही मामा चौक, दिपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कडकोट, पेशवे चौक, विठ्ठल मंदीर गांधी चमन किंवा जामा मस्जीद चौक, दिपक हॉस्पीटल किंवा रामतीर्थ, राजाबाग सवार दर्गा, कैकाडी मोहल्ला, जामा मस्जीद चौक मार्गे जाईल व येईल.

वरील आदेश दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी दुपारी 15.00 वाजेपासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक संपेपर्यंत अंमलात राहील

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments