डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांची फेरी

0
53

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांची फेरी

आत्ताच एक्सप्रेस
संभाजीनगर /प्रतिनिधी/छत्रपती संभाजीनगर – येथील भीमराज की बेटी महिला महोत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी केवळ महिलांच्याच सहभागाने फेरी आयोजित करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकलठाणा परीसरात पार पडलेली ही फेरी महिलांच्या एकतेचे व स्वावलंबनाचे प्रतिक ठरली. विविध विभागांतील हजारो महिलांनी या फेरीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या फेरीचे आयोजन शारदा वाघ , रुक्मिणी गवई, सुकेशनी जावळे, छाया केदारे, सुनीता पिंपोळे , संगीता जगताप, बबिता मेश्राम यांनी केले. समन्वयक म्हणून सविता पाखरे, आशा वाढवे, शितल बागुल, निला वाढवे, सुनीता म्हस्के, साळवे, संगीता आंबाडे यांनी काम पाहिले. मार्गदर्शक म्हणून डॉ. अर्चना त्रिभुवन, डॉ. शुभांगी थोरात, गोदावरी धाबे आणि त्रिशला मगरे यांचा मोलाचा सहभाग होता.
या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोतिपवले , उप संचालक डॉ. रामटेके यांचे सहकार्य लाभले.
फेरीत लेझीम, नृत्य, लाठीकाठी, हिंदू कोड बिलाचे फलक अशा विविध सादरीकरणांचा समावेश होता. या फेरीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले योगदान, त्यांची विचारसंपदा, व शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. चिकलठाणा ते भडकल गेट या मार्गावर ही ऐतिहासिक फेरी पार पडली.