कापसाचा दर जास्त व तयार सुताला कमी दर मिळत असल्याने सुतगिरण्या तोट्यातच चालत आहेत. यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत: माजी मंत्री डॉ. आण्णासाहेब डांगे
इस्लामपूर/प्रतिनिधी/ कापसाला दर जास्त व तयार सुताला कमी दर मिळत असल्याने सुतगिरण्या तोट्यातच चालत आहेत. यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत सरकार वस्त्रोद्योगा बाबत उदासिन आहे. यामुळे हजारो कुटुंबं बेरोजगार होत आहेत. यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. ३० वर्षापूर्वी दीनदयाळजी च्या जन्मदिनी आपल्या सुतगिरणीची मूहूर्त मेढ रोवली गेली. देशातील बऱ्याच सुतगिरण्या बंद अवस्थेत असुन बाकीच्या काही गिरण्या तोट्यात चालु आहेत. तरी ही आपणा सर्वांच्या सहकार्याने आपली दीनदयाळ सुतगिरणी सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीतही चांगले काम केले, उत्पादन काढले भविष्यात गिरणीचे चाक थांबणार नाही याची खबरदारी संचालक मंडळाने घ्यावी व या ही परिस्थितीवर मात करावी. सुतगिरणी निवडणूक कार्यक्रमाची आचारसंहिता असल्याने सभासदांना भेट वस्तु देता येत नाहीत असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री व दीनदयाळ सुतगिरणीचे संस्थापक मा. डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले.
दीनदयाळनगर, वाघवाडी येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लि., इस्लामपूरच्या कार्यस्थळावर ३० व्या वार्षीक साधारण सभेत प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रारंभी दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंती निमित्त उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीनदयाळजी यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. संस्थापक मा. डॉ. आण्णासाहेब डांगे यांच्या सत्कार माजी चेअरमन श्री. अमोल चौधरी यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व फेटा देवून करण्यात आला. प्रमुख उपस्थित सी. बी. पाटील, अँड. संपतराव पाटील, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, विश्वनाथ डांगे, वैभवराव पवार, अशोकराव देसाई, सागरभाऊ मलगुंडे, सी. एच. पाटील यांचा सत्कार सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, सुमंत महाजन, अशोकराव ऐडगे, रमेश वडे, माणीकराव गोतपागर व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला.
वार्षिक सभेतील अहवाल सालातील विषय पत्रिकांचे वाचन यामध्ये दैनंदीन कामकाजाचा अहवाल, वार्षिक साधारण सभेचा वृत्तांत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, सभेचे नोटीस वाचन जनरल मॅनेजर श्री. विनोद देशमुख, ताळेबंद, नफा तोटा पत्रके फायनान्स मॅनेजर श्री. राजेंद्र मिरजे, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचे निधानाबद्दल श्रध्दांजली ठराव जनसंपर्क अधिकारी श्री. बजरंग कदम, लेखा परिक्षण व दोष दुरूस्ती डेप्युटी फायनान्स मॅनेजर प्रकाश दगडे, आयकर, लेखा परिक्षक, विक्री कर, अबकारी कर, सल्लागारांची नियुक्ती बाबत असि. सिनिअर ऑफीसर उमेश गावडे, आयत्या वेळच्या विषयांचा चर्चा सिनिअर ऑफीसर राजेंद्र लोंढे आदी मान्यवरांनी विविध विषयांचे वाचन केले व सर्व ठराव सभासदांनी एकमताने टाळ्यांच्या गजरात मंजूर केले.
यावेळी वारणा व्हॅली खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. सी. बी. पाटील, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष. अँड. संपतराव पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष पै. अशोकराव पाटील, प्रकाश गडळे, जयराज पाटील, अजितभैया पाटील, संजय हवालदार, पांडुरंग वाघमोडे, प्रदिप वेंगुर्लेकर, धनपाल माळी, पांडूरंग पाटील, बाळासाहेब पवार, राजेंद्र गावडे, भानुदास विरकर, सुमित पाटील, बाळासाहेब चाऊस, सचिन देसाई, माणीकराव पाटील, यांच्या सह अनेक मान्यवर व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऐ. के. पाटील व अजित पाटील यांनी केले. सभासदांना ईश्वरपूर बसस्थानका पासुन ये – जा करण्यासाठी वहानांची व्यवस्था करण्यात आली होती, वार्षिक सभा यशस्वीतेसाठी एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, जनरल मॅनेजर विनोद देशमुख, फायनान्स मॅनेजर राजेंद्र मिरजे, लेबर ऑफीसर अदित्य यादव, प्रोडक्षण मॅनेजर गिरीश पत्की, इलेक्ट्रीक इंजिनिअर एस. आय. मेत्री, डेप्युटी मॅनेजर प्रकाश दगडे, एक्साईज ऑफीसर दादासाहेब पाटील, प्रशांत जाधव, जयवंत सुर्यवंशी, एच. आर. पाटील, श्रीहरी कुंभार, जावेद पठाण, अभिजित बारपठे, विजय पाटील, जयवंत सुर्यवंशी, संजय कुशिरे, संतोष माने यांनी विशेष प्रयत्न केले. शेवटी आभार जनरल मॅनेजर श्री. विनोद देशमुख यांनी मानले. सभेची सांगता वंदे मातरम या गिताने झाली.