डोंगरगावातुन नानाजी देशमुख कृर्षी संजिवनी प्रकल्पाचा शुभारंभ
कन्नड /प्रतिनिधी/सुनिल निकम/कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा शुभारंभ १ रोजी करण्यात आला. यावेळी सायंकाळी ग्राम कृषी विकास समितीचे अध्यक्षा तथा गावाचे सरपंच पुष्पा आग्रे यांच्या अध्यक्षतेखाली मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले तसेच सायंकाळी गाव बैठक घेण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी कन्नड अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनमध्ये ५० गावांची निवड झालेली असून, डोंगरगाव येथे गाव विकास सूक्ष्म कृती आराखड्याचा पथदर्शीय प्रकल्प राबवला जात आहे. यात गाव पातळीवर लोकसभागीय सूक्ष्म नियोजन प्रक्रिया १ ते ७ एप्रिलपर्यंत राबवली जात आहे. यामध्ये प्रत्येक दिवशी काय करायचे यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये गावात मशाल फेरी, सायंकाळी गाव बैठक, शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी, लोकसहभागातून गाव नकाशा, शिवार नकाशा, शिवार फेरी करण्यात येणार असून पाण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे तसेच महिला सभा व ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी प्रकल्पाविषयी सखोल
अशी माहिती दिली व मार्गदर्शन केले तसेच प्रकल्प समन्वयक इम्रान शेख यांनी प्रकल्प आराखडा यावर मार्गदर्शन केले. दिपक देशमुख यांनी पाण्याचा ताळेबंद यावर मार्गदर्शन केले. या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक उपस्थित होते.
हा आराखडा तयार करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लागणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक दिपक बिरारे यांनी केले व आभार प्रदर्शन उपसरपंच कैलास आग्रे यांनी मानले. २ रोजी गावात शाळेचा विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढून प्रकल्पाची जनजागृती, प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. प्रभात फेरीचे आयोजन व गाव नकाशा काढून घेण्यासाठी कृषी सहाय्यक निलेश खाडे, मंडळ कृषी अधिकारी तेजस नंदनवाळ यांनी सहकार्य केले. यानंतर उर्वरित दिवशी शिवार फेरी तसेच महिला सभेचे आयोजन व पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात येणार आहे व शेवटच्या दिवशी ग्रामसभा घेऊन प्रकल्प आराखड्याला मंजुरी देण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्राम कृषी विकास समितीचे सर्व सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात महीलांची उपस्थिती होती.