पूर्णा – पटना – पूर्णा एक्स्प्रेस मध्ये दोन डब्यांची तातपुरत्या स्वरुपात वाढ
प्रवाशांची गर्दी पाहता दक्षिण मध्य रेल्वे ने पूर्णा – पटना –पूर्णा एक्स्प्रेस मध्ये दोन डब्यांची वाढ तातपुरत्या स्वरुपात करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे
1. गाडी क्रमांक 17610 पूर्णा – पटना एक्स्प्रेस मध्ये दोन तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) चे डब्बे दिनांक 10.07.2025, 17.07.2025, 24.07.2025, 31.07.2025 रोजी पूर्णा येथून सुटणाऱ्या गाडीत तातपुरत्या स्वरुपात वाढविण्यात आले आहेत. या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 21 झाली आहे.
2. गाडी क्रमांक 17609 पटना – पूर्णा एक्स्प्रेस मध्ये दोन तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) चे डब्बे दिनांक 12.07.2025, 19.07.2025, 26.07.2025, 02.08.2025 रोजी पूर्णा येथून सुटणाऱ्या गाडीत तातपुरत्या स्वरुपात वाढविण्यात आले आहेत. या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 21 झाली आहे.
