Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादआमचा डीएनए ओबीसींचा आहे, पण राऊतांचा डीएनए अब्दाली की औरंगजेबाचा?

आमचा डीएनए ओबीसींचा आहे, पण राऊतांचा डीएनए अब्दाली की औरंगजेबाचा?

आमचा डीएनए ओबीसींचा आहेपण राऊतांचा डीएनए अब्दाली की औरंगजेबाचा?

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा संजय राऊतांना परखड सवाल

मराठा व ओबीसी आरक्षण गमावणाऱ्यांना टीकेचा अधिकार नाही

उबाठाचे खासदार संजय राऊत यांचा डीएनए अब्दालीचा आहे की औरंगजेबाचा आहे असा परखड सवाल करत भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी श्री. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ओबीसी डीएनए वरून केलेल्या टीकेचा गुरुवारी खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या तोंडी जातीची भाषा शोभत नाही असा आरोप श्री. राऊत यांनी केला होता त्यावरून त्यांना लक्ष्य करत श्री. बन यांनी राऊत हे ओबीसींचा घोर अपमान करत आहेत अशी टीका केली. ओबीसींचा प्रश्न जर कोणी सोडवत असेल तर तुम्ही लागलीच टीका करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सर्वसमावेशक विकासाचे, अठरा पगड जातींना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करत आहेत. ‘सबका साथ सबका विकास’ या मोदी सरकारच्या भूमिकेवर श्री. राऊत हे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हे कदापि मान्य नाही. मराठा व ओबीसी आरक्षण गमावणाऱ्यांना अशाप्रकारे टीका करण्याचा अधिकार नाही असेही श्री. बन यांनी खडसावले.

यावेळी श्री. बन म्हणाले की मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण गमावण्याचं पाप उबाठा आणि महाविकास आघाडीने केलं. ते आरक्षण परत मिळवून देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27% ओबीसी आरक्षण रद्द करण्याचं पापही महाविकास आघाडी सरकारने केले. ते ओबीसी आरक्षणही पुन्हा मिळवून देण्याचं श्रेय भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची महायुती अतिशय भक्कम आहे. जनतेच्या आशीर्वादाने महायुती सरकार सत्तेत आले आहे. मतांवर दरोडा टाकून तयार केलेल्या महाविकास आघाडीसारखी ते डळमळीत नाही. महाविकास आघाडी ही तिघाडी होती. तिघाडीची रिक्षा कधीच उलटली आहे. महायुती सरकार हे त्रिमूर्ती सरकार आहे जे सर्वसामान्य मराठी, मराठा, ओबीसी व 18 पगड जातीला न्याय देण्यासाठी प्रत्नशील आहे. महायुतीकडे स्ट्रॅटेजी नाही या श्री. राऊत यांच्या टीकेवर श्री. राऊत हे विधानसभा निवडणुकीत अर्ध्या मताने निवडून आले आहेत याची आठवण करून देत ते नकली चाणक्य आहेत असा शाब्दिक प्रहार केला. देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनीतीचा प्रत्यय विधानसभा, विधान परिषद निवडणुकीत जनतेला आला आहे. त्यामुळे नकली चाणक्यांनी स्ट्रॅटेजीबद्दल न बोललेलेच बरे असा खोचक सल्लाही श्री. बन यांनी दिला.

भुजबळांचा राजीनामा मागणाऱ्यांच्या पोटात दुखतंय.

देवेंद्र फडणवीस हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. म्हणूनच श्री. राऊत यांचे पोट दुखू लागलंय. बोलायला कुठलेही मुद्दे नाहीत म्हणून छगन भुजबळांचा राजीनामा मागताय. तुमच्या भावाला मंत्री करावं अशी मागणी तुम्ही केली होती, ती ठाकरे-पवारांनी मान्य केली नाही म्हणून पोटात दुखतंय. श्री. भुजबळ हे ओबीसींचे नेतृत्व करत आहेत. मराठा व ओबीसींसाठी उपसमिती नेमली आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला साधं वसतीगृहसुद्धा दिलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून असंख्य उद्योजक घडवले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments