Friday, April 3, 2026
Homeऔरंगाबाददिव्यांग क्षेत्रातील संस्था, संघटनांना दि.३० पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

दिव्यांग क्षेत्रातील संस्था, संघटनांना दि.३० पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

दिव्यांग क्षेत्रातील संस्था, संघटनांना दि.३० पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर  – दिव्यांगांच्या कल्याण, पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नागरी समाज संघटना व संस्थांची नोंदणी दि.३० पर्यंत करण्यात यावी असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी बाबासाहेब अरवत यांनी केले आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ४९ ते ५३ नुसार ही नोंदणी करणे अनिवार्य आहे, असेही कळविण्यात आले आहे.

या नोंदणीसाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा व्यक्ती, संस्था किंवा संघटना ज्यांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाचे आहे, त्यांनी दि. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत आयुक्त, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. नोंदणी नसलेल्या संस्था अथवा व्यक्ती दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असल्याचे आढळल्यास, त्यांच्या विरुद्ध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६  कलम ९१ नुसार कारवाई करण्यात येईल. तसेच शासनाच्या दि.१७ ऑक्टोबर २०२५ च्या निर्णयानुसार, वैध नोंदणीशिवाय कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना दिव्यांग क्षेत्रात कार्य करू शकत नाही. वैध नोंदणीशिवाय कार्य करणाऱ्या संस्थांवर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट तरतूद आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.

०००००

“एल्डर लाईन” १४५६७ – ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार / जेष्ठ नागरिकांसाठी १४५६७ राष्ट्रीय हेल्प लाईन  

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय,  भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने  जेष्ठ नागरिकांसाठी १४५६७ राट्रीय हेल्प लाईन ही सेवा देशभरातील सर्व राज्यात आणि केंद्रशाषित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे. जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते. “मानवसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा (MD) यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फौन्डेशन पुणे गेली ३७ वर्षापासून सातत्याने आपल्या विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृध्य, अपंग, निराधार, गरीब मुले मुली आणि महिला यांची सेवा करीत आहेत. जनसेवा फाउंडेशनला सयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.

महाराष्ट्रातील अंमलबजावणी: ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या या १४५६७ राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स आले असून, ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.

 हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत प्रमुख सेवा:

  • माहिती : आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, याबाबत माहिती.
  • मार्गदर्शन : कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७.
  • भावनिक आधार – मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापन.
  • बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पोलिस प्रशासनाशी समन्वय, समुपदेशन.

” एल्डर लाईन १४५६७” ही केवळ हेल्पलाईन नाही  तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते.  ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा,  असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments