धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान;
मत्स्य व्यवसाय विभागाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर –आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान (DAJGUA)’ हे महत्त्वपूर्ण राबविले जाणार आहे. अभियान सन २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीमध्ये आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधणे आहे. महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांतील १९२ तालुक्यांमधील ४९१७ गावांचा समावेश आहे .यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ तालुके (कन्नड, सोयगाव, सिल्लोड व खुलताबाद) आणि ११ गावांचा समावेश आहे.
या योजनेद्वारे आदिवासी क्षेत्र व समुदायांच्या विस्तृत विकासासाठी मूलभूत पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगार निर्मिती तसेच समस्यांच्या निराकरणाकरिता उपलब्ध संसाधनांमधील दुरावा व अंतर दूर करण्याचे उद्दिष्ट आहे.
या अभियानाच्या पार्श्वभूमीवर, दिनांक १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत ‘धरती आबा अभियान – Awareness and Benefit Saturation Camps’ (जागरूकता आणि लाभ संतृप्ती शिबिरे) हे विशेष अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये गाव पातळीवर तसेच क्लस्टर पातळीवर शिबिरे आयोजित करून शासनाच्या विविध सेवा प्रत्यक्षात पूर्णपणे नियोजन केले जाईल.
या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील ग्रामस्तरीय यंत्रणा तसेच सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय , छत्रपती संभाजीनगर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:
सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुग्धव्यवसाय विकास विभाग, पहिला माळा, दूध डेअरी सिग्नल जवळ, जालना रोड,छत्रपती संभाजीनगर.ई-मेल: acfchhatrapatisambhajnagar145@gmail.com यावर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. मथुरिमा जाधव यांनी केले आहे.
