Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादधार्मिक उपक्रमांमुळे गावात एकोपा व संस्कारात वाढ होते - भास्कर आबा दानवे

धार्मिक उपक्रमांमुळे गावात एकोपा व संस्कारात वाढ होते – भास्कर आबा दानवे

धार्मिक उपक्रमांमुळे गावात एकोपा व संस्कारात वाढ होते – भास्कर आबा दानवे

लोंढेवाडी येथे भागवत कथा ज्ञानयज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनिधी/ लोंढेवाडी (ता. जालना) येथे (ता.१२) समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात संपन्न झाला. या समाप्तीच्या कार्यक्रमात ह.भ.प. कृष्णाजी महाराज नवले यांनी आपल्या कीर्तनाद्वारे उपस्थित भक्तांना अध्यात्म, भक्ती व संस्कार यांचे मोल सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी उपस्थित कीर्तन श्रवण केले व ग्रामस्थांशी संवाद साधला.

भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, “अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे गावात एकोपा, श्रद्धा आणि संस्कारांची वाढ होते. या माध्यमातून समाजात आपुलकी, सहकार्य आणि सकारात्मकतेचा संदेश पोहोचतो. धर्म, संस्कार आणि समाजसेवा ही एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. समाजाच्या बांधणीसाठी आणि नव्या पिढीपर्यंत भारतीय संस्कृतीचे मूल्य पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. या सप्ताहाचे आयोजन केल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ, आयोजक मंडळ आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

या प्रसंगी सरपंच निवृत्ती लंके, सखाराम पवार, सखाराम उंबरे, भागवत आवळे, बाबुराव जाधव, दत्तात्रय उंबरे, प्रकाश उंबरे, शिवनाथ लोंढे, बाबुराव पटरे, बबन जाधव, विष्णूबापू डोंगरे, गोवर्धन कोल्हे, जिल्हा सरचिटणीस  सुनिल पवार, मौजपुरी सरपंच  माऊली उगले,  बद्रिनाथ भसांडे, निवृत्ती गायकवाड, तुषार गायकवाड, बाळूभाऊ लोहकरे,  सुभाष राठोड,  जीवन खुरमुटे तसेच पंचक्रोशीतील व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments