ख्रिश्चन धार्मिक गुरूंवर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे निवेदन
छत्रपती संभाजीनगर/ आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका जाहीर सभेत ख्रिश्चन धार्मिक गुरूंना मारणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून, या अत्यंत धक्कादायक आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विधानाच्या निषेधार्थ अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने आज पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात आमदार पडळकर यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवावा, तसेच त्यांच्या आमदारकीवर कारवाई करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे शहराध्यक्ष श्री. जॉन आव्हाड, जिल्हाध्यक्ष श्री. नितीन गायकवाड, कायदा सल्लागार अॅड. श्री डॅनियल टाकवले हे उपस्थित होते.
पा.आकाश उजागिरे