जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे जोमात
पोलीस कर्मचारी पठाडे बापुंचा आशिर्वाद
जाफ्राबाद/प्रतिनीधी/ जाफ्राबाद माहोरा भारज वरुड खासगाव या शहरातील विविध भागात जुगार अड्डे, मटका काऊंटर, दारूविक्री, गुटखा विक्री अशा अवैध धंद्यांनी चांगलेच डोके वर काढले आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती नागरिकांतुन वर्तविण्यात येत आहे. जाफ्राबाद पोलीस स्टेशनचे ए पि आय जाधव साहेब हे पोलीस कर्मचारी पठाडे बापुना सांगुन अवैध धंदेवाल्याकडुन पैसे जमा करुन अवैध धंदे वाल्यांकडुन हाप्ते खात असल्याची चर्चा नागरिकातुन होत आहे जाफ्राबाद पोलीस स्टेशन चे हाप्ता वसुली ही पोलीस कर्मचारी पठाडे बापु हे करीत आहे असे जनतेतुन म्हटले जात आहे.
पोलीस अधिक्षक अजय बंसाल साहेब यांचा जिल्यावर वचक राहीला नाही का? असा प्रश्न जनतेतुन उपस्थित होत आहे .
जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दीत सर्वच भागांमध्ये सध्या अवैधरित्या सुरु असलेला मटका व्यवसाय तरुणांच्या भविष्यासाठी मोठा धोका ठरत आहे.रोजगाराच्या संधी कमी असल्याने व जलद पैसा कमावण्याच्या लालसेने अनेक तरुण या अनैतिक मार्गाकडे वळत आहेत.त्यामुळे केवळ त्याचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांचेही आयुष्य उध्वस्त होताना दिसत आहे.मटका हा एक प्रकारचा जुगार असुन तो कायद्याने गुन्हा मानला जातो.
मात्र पोलीसांचे दुर्लक्ष आणी वाढत्या बेरोजगारीमुळे जाफ्राबाद शहरासह व जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दीत अनेक गावांमध्ये मटका काउंटर खुलेआम सुरु असल्याचे निदर्शनात येत आहे.
दैनंदिन लहान-मोठे आकडे लावण्याच्या नावाखाली तरुणांची आर्थिक व मानसिक लुट सुरु असुन,हरले कि चोरी फसवणूक घरफोडी अशा गुन्हांकडे त्यांचा कल वाढतोय,अशी चिंता सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दीत परिसरात खुले आम मोटारसाइकल ने दारु सप्लाय होते अशा प्रकारे देशी दारुची विक्री होत आहे शाळा काॅलेजचे विद्यार्थी हे दारुच्या आहेरी जात असुन विद्यार्थी दारु मधे भरकटत आहे ह्या दारु विक्रेत्यांनी लायसन काढले का काय यांच्यावर कारवाही का होत नाही असा प्रश्न नागरीकातुन उपस्थित होत आहे तसेच जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा बंदी कायदा नावालाच आहे गुटख्याची खुलेआम विक्री होत असुन जाफ्राबाद पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येक किराणा दुकानात प्रत्येक चौकाचौकामध्ये पानटपर्यांवर गुटखा हा सहज उपलब्ध होत आहे गुटखा सप्लायर हे मोटारसायकल वर गावागावात टपर्या-टपर्यांवर पोतेच्या पोते भरुन गुटखा सप्लाय करत आहे शाळा,कॉलेज परिसरात सर्रास गुटखा विक्री होत असल्याने शाळकरी मुले हे गुटखा व्यसनाच्या आहारी जात आहे जाफ्राबाद पोलीस स्टेशन आणी अन्न भेसळ अधीकारी हे हाप्ते खाऊन झोपेचे सोंग घेत आहेत पोलिस कारवाई करीत नसल्याने संतप्त नागरिकांनी कुठे-कुठे अवैध धंदे सुरू आहेत याची कुंडलीच पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. असा आक्रोश नागरिकातुन व्यक्त करण्यात आला आहे.
जाफ्राबाद तालुक्यात घरफोडी,मोटार चोरी,मोटारसायकल चोरी,चेन लिफ्टिंग, मोबाईल चोरी, ,हाणामारीच्या घटनांना आळा घालण्यात अद्याप जाफ्राबाद पोलिसांना यश आले नाही. चौकाचौकात सुरू असलेले मटका काउंटर, जुगार अड्डे व गुटखा विक्री, दारू विक्रीमुळे सामान्य नागरिक जेरीस आले आहेत. अवैध धंद्यांवर पोलिस अधीक्षकांचा अंकुश राहिला नाही, असा आरोप करण्यात येत आहे. जाफ्राबाद पोलीस हद्दीमधे तहसील कार्यालय परिसर, किल्ला,बस स्थानक परिसर,तसेच माहोरा भारज,वरुड खासगाव आदी परिसरात खुलेआम मटका काउंटर जुगार अड्डे, गुटखा विक्री ,दारु विक्री जोमात सुरू आहेत. ग्रामीण भागातून कामाच्या शोधात आलेला मजुर वर्ग गुटखा दारु मटका-जुगाराच्या आहारी जात आहे. सामान्य जनतेला मटका अड्डे,दारु विक्री गुटखा विक्री, जुगार अड्डे दिसत असताना खाकी वर्दीतील जाफ्राबाद पोलीस स्टेशन रक्षकांनी हाप्ते खाऊन डोळ्यावर पट्टी बांधली काय, असा प्रश्न नागरिकांतुन उपस्थित करण्यात येत आहे.
जाफ्राबाद भारज वरुड खासगाव माहोरा परिसरात गेल्या बारा महिन्यांपासून अवैध दारू, मटका काउंटर, गांजा विक्री, जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैध व्यावसायिकांना स्थानिकांनी व्यवसाय बंद करण्याची मागणी केली. उलट नागरिकांवरच दादागिरी करीत धमकाविण्यात आले. जाफ्राबाद, माहोरा, भारज, वरुड, खासगाव या भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवैध धंदे तत्काळ बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जाफ्राबाद तालुका परिसरातील नागरिक पोलीस ठाणेदारांना देत आहे.