सार्वजनिक गणेशोत्सवासाठी देणगी गोळा
करण्यासाठी आता ऑनलाईन परवानगी
जालना/ सार्वजनिक गणेशोत्सव-2025 साठी वर्गणी, देणगी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 क अन्वये सहायक धर्मादाय आयुक्त जालना कार्यालयाकडून पुर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तरी ऑनलाईन पध्दतीने परवानगीसाठी गणेश मंडळांनी charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती सुजाता शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
अर्जासोबत गणेश मंडळाचा ठराव, जागेचे ग्रामपंचायतीचे किंवा नगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र, विजेचे बिल, सभासदाचे आधार, पॅनकार्डची प्रत, मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास प्रत, मागील वर्षाचे हिशोबपत्र जोडावेत. अर्ज बरोबर व नियमानूसार असल्यास अर्जात नमुद ई-मेलवर परवानगीचे पत्र पाठविण्यात येईल. असेही कळविले आहे.
