Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादपत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या कार्यकारिणीत भर; पदोन्नती व नियुक्ती सोहळा उत्साहात पार

पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या कार्यकारिणीत भर; पदोन्नती व नियुक्ती सोहळा उत्साहात पार

पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या कार्यकारिणीत भर; पदोन्नती व नियुक्ती सोहळा उत्साहात पार

देगलूर/प्रतिनिधी/ पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने सक्रिय असलेल्या पत्रकार संरक्षण समिती देगलूर तालुकाच्या कार्यकारिणीत नवीन पदाधिकाऱ्यांची भर टाकण्यात आली. आज तालुकाध्यक्ष शेख असलम यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या संपर्क कार्यालयात पदोन्नती व नियुक्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
      या कार्यक्रमात धनाजी जोशी यांना सहकार्याध्यक्ष म्हणून पदोन्नती देण्यात आली. तर श्वेता चिदमलवाड यांची संघटक, प्रभु वंकलवार यांची सहसंघटक, आणि इस्माईल खान यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
        कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका सचिव गजानन टेकाळे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “मागील सहा महिन्यांपासून पत्रकार संरक्षण समितीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, पत्रकारांच्या सन्मानासाठी सतत कार्यरत राहिली आहे. अडचणीत सापडलेल्या पत्रकारांसाठी धावून जाणारी ही संघटना आहे,” असे ते म्हणाले.
       कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना तालुकाध्यक्ष शेख असलम यांनी सांगितले की, “पत्रकार संरक्षण समिती ही संघटना नसून पत्रकारांचे कुटुंब आहे. कोणत्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. कोणताही गट, पक्ष न पाहता पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे ध्येय आहे.”
        दरम्यान नवीन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत, संघटनेच्या कामात जबाबदारीने योगदान देण्याचे आश्वासन दिले.
       यावेळी कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, कोषाध्यक्ष तोहिद काझी, सदस्य उबेद हबीब, पत्रकार अनिल पवार, शेख अफान व अन्य पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सहकोषाध्यक्ष गजानन शिंदे केले तर आभार प्रदर्शन तालुका सचिव गजानन टेकाळे यांनी केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments