मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त
महारक्तदान शिबिर
वैजापूर/प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापुरात भाजपकडून महारक्तदान संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वैजापूर नगरपालिकेच्या भगवान महावीर रुग्णालयात
२२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथील दत्ताजी भाले, रक्तपेढी कडून हे रक्त संकलन करण्यात येणार आहे.
वैजापूर शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी व भाजप कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करावे असे आव्हान माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी व भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे यामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते.आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तदान केलेच पाहिजे.