राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्ताने बाजार सावंगी येथे रक्तदान शिबिर संपन्न
सावंगी/प्रतिनिधी/ बाजार सावंगी – खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार (दि.२२) येथील श्री रेणुका माता मंदिर सभागृहात भाजप पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले
शिबिराचे उद्घाटन सकाळी आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एल.जी गायकवाड ज्ञानेश्वर नलावडे तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण पुंजाजी नलावडे विकास कापसे किशोर नलावडे शिवाजी गायकवाड संतोष गायकवाड अंकुश काळे बाळू नलावडे आनंदा काटकर कैलास गायकवाड यांची उपस्थिती होती
रक्तात आहे राष्ट्रभक्ती करूया रक्तदान देऊया जीवदान या उद्देशाने परिसरातील पंधरा गावातील पुरुषांनी तसेच जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकांनी रक्तदान केले
चार वाजेपर्यंत ८४ रक्तदात्यांनी रक्तदाना त सहभाग नोंदविला
अमृता ब्लड सेंटर छत्रपती संभाजीनगर च्या रक्तपेढीने व त्यांचे पाच कर्मचारी यांनी दिवसभर परिश्रम घेतले रक्तदात्यांना रक्तदान झाल्यानंतर रक्तपेढी व भाजप पक्षाच्या वतीने असे दोन प्रशस्ती पत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले