Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादविष्णुनगर जैन मंदिरात दसलक्षण महापर्वास भक्तीभावाने सुरवात

विष्णुनगर जैन मंदिरात दसलक्षण महापर्वास भक्तीभावाने सुरवात

विष्णुनगर जैन मंदिरात दसलक्षण महापर्वास भक्तीभावाने सुरवात
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/  श्री विष्णुनगर चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर येथे पर्युषण पर्व निमीत्त्त कळस स्थापना ध्वजारोहन करण्यात आला. यावेळी  सौधर्म इंद्र नारायणराव क्षिरसागर , पदमाबाई क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिराचे अध्यक्ष सुधाकर क्षिरसागर  व सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते. पर्युषण पर्व निमीत्त्त मंदिरात दररोज सकाळी ८ वाजता भगवंताचा अभिषेक शांतीमंत्र पुजन करण्यात येत आहे. तसेच महिला मंडळा तर्फ विधान पुजन होते. रात्री ७ वाजता संगीतमय आरती व संस्कृतीक कार्यक्रम होत आहे. पर्युषण पर्व काळात 9 दिवस दररोज पुजेचा मान बाहुबली वायकोस ,सुधाकर क्षिरसागर, प्रकाश खुळे, महावीर जैन , किशोर क्षिरसागर, संतोष गोसावी, देवेंद्र क्षिरसागर, राहुल गोसावी, विजय क्षिरसागर आदी परिवारांना मिळाला आहे.
तसेच दिनांक २८ ऑगस्ट ते ५ सप्टेबर पर्यत दररोज रात्री महिला मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले आहे. दिनांक ०७ सप्टेबर रोजी बक्षीस वितरण व शोभायात्रा क्षमावली व महाप्रसादाने पर्युषण पर्वाची सांगता होईल महाप्रसाद 9 सप्टेंबर ला सिन्दी भवन येथे होईल.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments