छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/ मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी राज्यभरात ‘दर्पण दिन’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आरोग्य शिबिर दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नूर हॉस्पिटल, बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून पत्रकार बांधवांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष प्रदेश (साप्ताहिक विंग) अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद यांनी सांगितले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व पत्रकारांनी वेळेवर उपस्थित राहून दर्पण दिन उत्साहात साजरा करावा. तसेच व्हॉइस ऑफ मीडिया प्रदेश अध्यक्ष (सा.वि.) व आयोजक अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद आणि जिल्हाध्यक्ष डॉ. शकील शेख यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत माहिती दिली.
या उपक्रमासाठी शेखलाल शेख, किशोर महाजन, परवेज खान, सय्यद मेराज अली, सतिश रेंगे, अमित फुटाने, रवि माताडे, सैय्यद लाईकोद्दीन, संजय हिंगोलिकर, रमेश जाबा, गणेश पवार, तोफिक शहेबाज, बबन सोनवने, शेख शफीक, अहमद अल हामेद, सय्यद मोईन, अलीम बेग, मोहंमद इसाकोद्दीन, आरेफ देशमुख, एम. ए. शकील, शेख इब्राहिम, शेख झाकीर, मनीष अग्रवाल, सय्यद नदीम सौदागर, सुरेश शिरसागर, सय्यद शब्बीर, रविंद्र शेलार, अॅड. अंबादास तळनकर, सुजित ताजने, शेख रफीक, अकिब अहमद, आबासाहेब धुमाळ, इस्माईल खान, शेख सिराज, इलयास शेख, इस्माईल हुसैन, सय्यद करीम, अनीस रामपुरे, शकील अहमद शेख, दिशा सुरवसे पाटील, काझी साहेब आदींनी पत्रकार बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.