सिल्लोड तहसीलदार सतीश सोनी हे ॲक्शन मोडवर वाळू माफिया कडून लाखोचा दंड वसुल
सिल्लोड तालुक्यात महसूल विभागाची अवैध वाळू चोरा विरोधात जोरदार कार्यवाही.
आत्ताच एक्सप्रेस
सिल्लोड/प्रतिनिधी/ सिल्लोड तालुक्यात महसूल विभागाची मागील दिवसांपासुन अवैध वाळू चोरा विरोधात जोरदार कार्यवाही सत्र सुरू,अवैध वाळू वाहतूक करणाराचे दणाणले धाबे,या धाडसत्रामुळे सामान्य जनतेने महसूल विभागाविषयी केले समाधान व्यक्त.
सिल्लोड तालुक्यात मागील दोन महीन्यापुर्वी नव्याने रुजू झाले तहसिलदार यांनी सुरुवातीच्या काळात वेट ऍण्ड वाॅच ची भूमिका घेतली व याच दरम्यान त्यांनी सर्व तालुक्यांतील महसूल विभागाची व अवैध वाळू वाहतूक करणारांचा सखोल अशी माहीती जमा केली व नंतर काही दिवसांपुर्वी संबंधित तहसीलदार सतीश सोनी हे ॲक्शन मोडवर येत संपूर्ण महसूल यंत्रणेला अवैध वाळू उपसा विरोधात कामाला लावले व काही दिवसांत अवैध वाळू वाहतूक करणारे अनेक वाहने जप्त करत लाखो रुपयांचा दंड वसुल केला, त्यांच्या या धडक कारवाई मुळे तालुक्यांतील अवैध वाळू वाहतूक करणारे व काही हफ्तेखोरांना चांगलाच लगाम लागला आहे अशा चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे.दुसरीकडे तालुक्यात महसूल विभागातर्फे अवैध वाळू वाहतूक करणारा विरोधात जोरदार धाडसत्र चालू केले आहे व यात महसूल विभागाला बऱ्यापैकी यश मिळाले आहे, परंतू महसूल मधीलच काही लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे,यामुळे तहसिलदार सतीश सोनी यांनी आपल्याच महसूल विभागातील काही मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण महसूल विभागाची बदनामी थांबविण्यासाठी व सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी या लाचखोर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे,याअवैध वाळू व आपल्याच महसूल विभागाच्या लाचखोर कर्मचारी प्रकरणी तहसिलदार सतीष सोनी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.