गवळीशिवरा येथील डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे गावकऱ्यांनी चक्क रस्ता हाताने उखडून दाखवत केला संताप व्यक्त
गवळीशिवरा येथील महारुद्र मारुतीला जाणाऱ्या रस्त्याच्या खड्डयात असणाऱ्या पाण्यात ओतले डांबर चार कोटी रुपये बजेटमधून खर्च करून करीत आहे निकृष्ट दर्जाचा रस्ता..
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथील असणाऱ्या आराध्यदैवत येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनाला श्रावण महिण्यात भाविकांचीं तोबा गर्दी असते मात्र लासूर स्टेशन येथून गवळीशिवरा येथे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याचे काम बजेटमधून ४ कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारमार्फत हे करत आहे मात्र डांबरीकरण करताना जुन्या रस्त्याच्या खड्ड्यात पाणी साचलेले असताना हि त्यावर डांबर ओतण्यात आले त्यामुळे डांबर आणि खडीचा थर गावकऱ्यांनी अक्षरशः हाताने चिकट टेप सारखा ओरबाडून काढला त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत ठेकेदाराला विचारणा केली त्यानंतर जिल्हा माजी बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव यांनी गावकऱ्यासमक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकरी अभियंता विरवाडेकर यांना मोबाईलवरून संपर्क साधला व निकृष्ठ काम होत असल्याबावत जाब विचारला व नियमाप्रमाणे काम करा तसेच पावसाळा असेपर्यंत व श्रावण महिना जवळ आल्याकारणाने फक्त रस्त्यातील खड्डे बुजवा व दिवाळीनंतर संपूर्ण रस्त्याचे काम करा असे सांगितले . दरम्यान एका वृद्ध गावकऱ्यांनें तर ठेकेदार व अधिकाऱ्यानो थोड्या तरी लाजा बाळगा,किमान महारुद्र देवाच्या दारात जाणारा रस्ता तरी नीट करा अशी आर्त मागणी केली आहे.