डाक विभागातील गैरहजर कर्मचाऱ्यास आवाहन
छत्रपती संभाजीनगर –छत्रपती संभाजीनगर येथील पोस्टल असिस्टंट पदावरील कार्यरत कर्मचारी स्वप्निल महादेव तुपशेंद्रे हे दि.२४ मार्च २०२५पासून अनधिकृतरित्या गैरहजर आहेत. याबाबत त्यांना दि.२८ एप्रिल र्पजी पत्र व इमेल द्वारे कळवून तात्काळ हजर होण्याच्या सुचना देण्यात आल्या मात्र ते हजर झाले नाहीत. सतत गैरहजर असल्यामुळे त्यांना नियम १४ अन्वये आरोपपत्र दि.१० सप्टेंबर रोजी देण्यात आले ते त्यांच्या घरच्या पत्त्यावर नोंदणीकृत डाकेने देण्यात आले मात्र दिलेल्या पत्त्यावर प्राप्तकर्ता रहात नाही अशी नोंद झाली. त्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून जाहीर सुचना देऊन त्यांना कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायं.६ यावेळात कार्यालयात हजर राहून आपले आरोपपत्र प्राप्त करावे,असे आवाहन सहायक निदेशक डाक सेवा, पोस्टमास्तर जनरल कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
