Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादडाक अदालत दि.२२ रोजी

डाक अदालत दि.२२ रोजी

डाक अदालत दि.२२ रोजी

छत्रपती संभाजीनगर –  टपाल विभागातील सेवांबद्दल असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात सोमवार दि.२२ रोजी  डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर डाक विभागाच्या सेवांबाबत तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल अशा तक्रारींची दखल या डाक अदालत मध्ये घेतली जाते. तरी संबंधितांनी आपली डाक सेवेबाबतची तक्रार प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर-४३१००१ यांच्या नावे दोन प्रतित दि.१९ पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. नंतर प्राप्त तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments