Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबाददहिगाव येथे सुविधांचा भयंकर अभावामुळे मुळे स्मशानभूमीची दयनीय अवस्था प्रेत रस्त्यावर जळण्याची...

दहिगाव येथे सुविधांचा भयंकर अभावामुळे मुळे स्मशानभूमीची दयनीय अवस्था प्रेत रस्त्यावर जळण्याची वेळ

दहिगाव येथे सुविधांचा भयंकर अभावामुळे मुळे स्मशानभूमीची दयनीय अवस्था प्रेत रस्त्यावर जळण्याची वेळ

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील स्मशानभूमीची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भयावह होत चालली आहे. मूलभूत सुविधा तर दूरच, पण किमान स्वच्छता आणि सुरक्षिततेची सोयदेखील नसल्याने ग्रामस्थांना त्यांच्या प्रियजनांच्या अंत्यविधीसाठी अक्षरशः अमानुष परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
स्मशानभूमीत बसण्यासाठी बाके नाहीत, संरक्षणभिंत नाही, छायेसाठी शेड नाही—अशा परिस्थितीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हात, वाऱ्यात, पावसात उभे राहून विधी करणे भाग पडते. ग्रामस्थांच्या वेदना ऐकूनही प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याची भावना येथे निर्माण झाली आहे.
विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच भीषण होते. परिसर चिखलात होरपळतो, पाणी साचते, रस्ता वाहून जातो आणि स्मशानभूमी वापरण्यायोग्यच राहत नाही. अनेकदा मृतदेह पावसात स्मशानभूमीत नेणेच शक्य नसल्याने प्रेत रस्त्यालगतच जाळण्याची वेळ येते—ही वास्तव परिस्थिती ग्रामस्थांनी दुःखाने सांगितली.
ग्रामस्थांचे प्रशासकांकडे वारंवार निवेदन, मागण्या आणि तक्रारी करूनही अद्याप कुठलाही ठोस पुढाकार घेतलेला नाही.
ग्रामस्थांचा ठाम आग्रह आहे की,संरक्षणभिंत उभारणे
स्मशानभूमी परिसराची स्वच्छता व्यवस्था
बसण्यासाठी बाके व शेडची उभारणी
या अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments